महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता आधार कार्ड प्रमाणेच शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी मिळणार आहे. म्हणजेच आपल्या शेतीचा सातबारा हा आधार कार्ड सोबत जोडला जाणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी, कर्ज प्रकरण इतर कामासाठी “Agristack Maharashtra” फार्मर आयडी महत्वपूर्ण ठरणार आहे. या फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती हि एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाची हि अँग्रीस्टँक हि योजना राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्री मंडळामध्ये घेण्यात आला होता. राज्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने देण्याकरिता हि योजना राज्यात राबिविली जात आहे, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपले अँग्रीस्टँक फार्मर आयडी काढावा लागणार आहे. या फार्मर आयडी मुळे राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ओळख क्रमांक मिळणार आहे. यामुळे शेतीशी संबधित सर्व योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत DBT च्या माध्यमातून पोहचवता येतील.

अ‍ॅग्रीस्टॅक हा भारत सरकारचा एक डिजिटल उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा आणि फायदे सुलभ करण्यासाठी एक एकीकृत व्यासपीठ तयार करणे आहे. महाराष्ट्रात, हा उपक्रम “अ‍ॅग्रीस्टॅक महाराष्ट्र” प्रकल्प म्हणून तयार करण्यात आला आहे, जो शेतकऱ्यांचा, त्यांच्या जमिनीचा आणि शेती पद्धतींचा केंद्रीकृत डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा डेटाबेस लाभार्थ्यांना थेट सरकारी योजना आणि सेवा कार्यक्षमतेने पोहोचवण्यास मदत करतो.

अ‍ॅग्रीस्टॅक महाराष्ट्राची प्रमुख वैशिष्ट्ये

  • अद्वितीय शेतकरी आयडी : प्रत्येक शेतकऱ्याला एक वेगळा आयडी नियुक्त केला जातो जो वैयक्तिक तपशील, जमिनीच्या नोंदी आणि बँक माहिती एकत्रित करतो, विविध कृषी सेवांमध्ये प्रवेश सुलभ करतो.
  • थेट लाभ हस्तांतरण (DBT) : हे व्यासपीठ सुनिश्चित करते की अनुदाने आणि आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते, पारदर्शकता वाढवते आणि विलंब कमी करते.
  • सरकारी योजनांमध्ये प्रवेश : नोंदणीकृत शेतकरी पीएम किसान सन्मान योजना, पीक विमा आणि आपत्ती भरपाई यासारख्या योजनांमधून अखंडपणे लाभ घेऊ शकतात.
  • बाजारपेठ दुवे : अ‍ॅग्रीस्टॅक शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंतर्दृष्टी प्रदान करते आणि ई-नाम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे किमान आधारभूत किमतीवर (MSP) उत्पादनांची विक्री सुलभ करते, ज्यामुळे चांगली किंमत आणि बाजारपेठ उपलब्धता सुनिश्चित होते.

Agristack Maharashtra Highlights

योजनेचे नाव Agristack
योजना सुरु कोणी केली
केंद्र शासन (महाराष्ट्र शासन)
वर्ष
२०२५
Agristack Official Website
Agristack Maharashtra Official Website
नोंदणी करण्याची पध्दत
ऑनलाईन
योजनेची लाभार्थी
शेतकरी
राज्यात राबविणारा विभाग
महसूल विभाग

Agristack Registration Documents Required

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • ७/१२ उतारा, ८अ
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी (असेल तर)

ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकतात.

Agristack Farmer ID खालील योजनांसाठी फायदेशीर ठरणार

  • PM किसान योजना
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना
  • पिक कर्ज योजना
  • कृषी यांत्रिकीकरण योजना
  • फळबाग लागवड योजना
  • विविध शेतकरी योजना
  • विविध सिंचन योजना
  • सिंचन विहीर योजना
  • पशुसंवर्धन योजना
  • शेतीसंबधित विविध योजना

ॲग्रीस्टॅकमध्ये शेतकऱ्याची खालील माहिती मिळणार

  • शेतकऱ्याची संबधित माहिती संकलित केली जाणार.
  • संकलित माहितीच्या आधारे विविध योजनांचा लाभ देणे सोपे होणार.
  • शेतकऱ्याची ७/१२  संबंधित माहिती संकलित केली जाणार.

Agristack Maharashtra Registration Process

ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

शेतकऱ्यांना मोबाईल वरून फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. परंतु शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), महा ई सेवा केंद्र याठिकाणी जावून आपले रजिस्ट्रेशन करून फार्मर आयडी काढू शकतात.